Sunday 30 March, 2008

निवडक वपुं २

चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!

-------------------------------------------------------------------------------------------------
सावली देऊ शकणार्‍या वट वृक्षान
विश्रांतीला आलेल्या पाथस्थाला
बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का?
अस विचारायच नसत..............

-------------------------------------------------------------------------------------------------
जन्माला आलेल्या प्रत्येकाला आई आणि बापाच प्रेम लाभायलाच हव दोघांच्याही प्रेमात खूप फरक असतो कस सांगू?
मुलाला जे हव ते मुलाने मागण्यापूर्वीच आईला समजलेला असत.बापाला पुष्कळदा ते सांगितल्यावर समजत,
म्हणूनच हट्ट करून एखादी गोष्ट वसूल केल्याचा आनद वडिलांकडून भेटतो.
आईच प्रेम आंधळ,भाबडा महणून की काय,मुलाच चुकल की तो तिला स्वत:चा पराभव वाटतो.
स्वत:च नुकसान झाल असाच ती मानते.बापाच प्रेम डोळस महणून मुलाच्या हातून होणार्‍या चुकांचे फटके मुलालाच जास्त बसणार म्हणून तो कसावीस होतो.
अंगावर वार झाले तर आईचे प्रेम फुंकर घालते,पण बाप होणारे वार वरच्यावर अडवू शकतो.
म्हणूनच आईच्या प्रेमाला पारख होण्याची पाळी आली तर गाभार्याताली समई विझल्यासारख वाटत आणि बापच प्रेम लाभाल नाही तर त्याच देवळचा कळस कुणीतरी नेल्यासारखी अवस्था होते.
म्हणूनच मुलाला दोघही हवीत.
कडाक्याची थंडी पडली की शाल घेऊन भागात नाही आणि नुसत ब्लॅंकेट असल तरी पोरकेपणाची भावना तशीच राहते,
म्हणून आईच्या शलिच्या वर बापाच भरभक्कम ब्लॅंकेट हव............................
..........

-------------------------------------------------------------------------------------------------
आपण जसे आहोत तसे असायला नको होत;
हे वाटण ह्यालाच माणूस म्हणतात................

-------------------------------------------------------------------------------------------------
जिथे आहे, तिथे न रमत, ते मन................

-------------------------------------------------------------------------------------------------
जगात पुरुषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फार, म्हणजे फारच मोजके आहेत.
पुरुषार्थ म्हणजेजे रसिकता.
जबरदस्ती नव्हे, शारिरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद.
ज्याला हि मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला.
असा पुरुष, पुरुष असला तरी कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही........,
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे.
त्याने निर्माण केलेली सृष्टि पहा.
तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे.
इथं लहान काहीच नाही.
एक माणुस पहा!
केवढी विराट निर्मिती माणुस म्हणजे.
पर्वतराशी जेवध्या प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच माणुस
- प्रत्येक माणुस प्रचंड, अमर्याद आणि गुढही.
माणसाला बहाल केलेली पंचेन्द्रिये ही त्याचीच साक्ष.
नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया.
म्हणुनच हमी वाटते कि ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं,
तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टीने करणार नाही.
मझी श्रध्दा आहे, कि परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यु हा जिवनापेक्षा विरात आहे,
जीवनापेक्षा लोभस आसनार.

-------------------------------------------------------------------------------------------------

कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच.

-------------------------------------------------------------------------------------------------
आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------
वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुडबुड करत नाही. आपण त्याला वापरतो, पण तो स्वतःच अस्तित्वही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो, तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही. तो तुम्हाला उध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात.

No comments: