Sunday 30 March, 2008

निवडक वपुं ४

-------------------------------------------------------------------------------------------------

माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक घाग्यांनी परमेश्वराने विणलेलं असतं. ते आपण फार काळजीपुर्वक जपावं लागतं. त्यातला एक घागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नाही. उलट त्याच्या आसपासचे घागेच नकळत उसवले जातात. आणि मग पडणारं छिद्र मनाला, हृदयाला फार मोठठी जखम करतं. आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते नि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी (निघणार) काढणार?

-------------------------------------------------------------------------------------------------

’जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल?’

"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा

दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."

"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.

त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.

ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."

-------------------------------------------------------------------------------------------------

असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो.

पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो.

स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.

ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात.

प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर

अर्पण करणारा लंकाधिपती असतो,

तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात.

-------------------------------------------------------------------------------------------------

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शनाच्या सीमेबाहेर त्याला पितालून लावेपर्यन्ताच सगला संघर्ष करावा लागतो त्याने एकदा स्वतहाची गति घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो....

असच मानसाचे आहे.

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उन्चिवर पोहचलात की आयुष्याताल्या अनेक समस्या ही उंचिच सोदवते...

-------------------------------------------------------------------------------------------------

दोन माणसांना जवळ आणू असं निव्व्ळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येत नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनवलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे दुस-या रंगात चांगले एकरुप होतात. ह्या कोणी का? म्हणून विचारले तर काय सांगायचं?

-------------------------------------------------------------------------------------------------

मैत्रितली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातुनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्ह. सायीखालच्या दूधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणचे आठवते त्या आधीपासून आपण मैत्रित पडलेले असतो.

-------------------------------------------------------------------------------------------------

आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..

-------------------------------------------------------------------------------------------------

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------

'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल.

स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.

आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही.

आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.

माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!

-------------------------------------------------------------------------------------------------

जेव्हा कुणी आपल्याला दु:ख देतं, तेव्हा त्याही पेक्षा मोठं दु:ख आपल्याही नकळत आपल्याकडून त्याना पोहोचलेलं असतं..!!

-------------------------------------------------------------------------------------------------

न मावणारं दु:ख नेहमीच जीवघेणं असतं.

कारण तुमचा जीवच तेव्हा दुखापेक्षा लहान झालेला असतो.

तेव्हा माणसाने नेहमीच दुखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं.

दु:ख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं भांडंवापरायचं.

पण इतरांच्या संदर्भात एकाअश्रुनेहि भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं..!

-------------------------------------------------------------------------------------------------

No comments: