Sunday 7 October, 2007

[HOMESICK]

मातीची ओढ माणसाला का असते याला काही उत्तर नाही ! सुखा-समाधात आणि स्वर्गीय आरामात जीवन जगत मातीची आठवण झाली की भडभडून येत.स्थल काल आणि प्रसन्ग याच बन्धन तोडून वार्यावर स्वार व्हाव आणि मात्रुभूमीच दर्शन घ्ययला निघाव हा विचार कित्येकदा येतो.
जगाच्या पठीवर कुठेही गेलो तरी माझी भूमी मला आधार देते आणि वेळप्रसन्गी मझ्या व्यथा एकून माझे सान्त्वन करते. मात्रुभूमीची ओढ परदेशस्थ भारतीयाल पदोपदी जाणवते.
[HOMESICK] या इन्ग्रजी भाषेतील शब्दाला मराठी प्रतिशब्द नाही याच कारण काय असा ? याचा विचार करताना कदाचित गाव आणि देश फारकाळ सोडून परदेशात राहणार्या मराठी लोकन्ची सन्ख्याच कमी त्यामुळे समूहमनातून अशा सन्कल्पनेचा उदय झाला नसावा.