Sunday 30 March, 2008

निवडक वपुं १

मैफ़लींचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो, तुम्च्यासमोर ठेवायचं. खरं तर, कुणी काही सांगावं, ह्याची तुम्हाला गरज नाही. तरीही सगळे लेखक लिहीत राहीले. वास्तविक, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं.

दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणुक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतली एकही छ्टा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहीली नसती तरी चाललं असतं. तरी इतकी पुस्तकं निघतात. कारण, अहंकार

मलाही जग समजलय हे सांगायचा अट्टहास.

मी तरी एवढं लेखन का केलं ?

मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं.
-------------------------------------------------------------------------------------------------

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल, तर क्षितीज नक्की गाठता यॆत. आपल्या रक्तातच धमक असॆल,तर जगंही जिंकता यॆत. आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं, त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं. असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद, त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

-------------------------------------------------------------------------------------------------
एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा परिसराचं मौन म्हणजे एकांत; आणी परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण.एकाकी वाटलं तरं मनसोक्त रडावं.अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे.पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात.आणि दिसेनासे होतात,तसा माणूसही हलका होतो;आकाशाजवळ पोहोचतो.असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर ;तुकाराम - "तूका, आकाशाएवढा" असं लिहून गेला असेल.

-------------------------------------------------------------------------------------------------
निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे हे काळावर मोजायचं की बुद्धीवर ? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग ? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो. फ़क्त वेळ वापरायला शिकत नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वॄंदावनातच रहाते. तिच्यापुढे आपल्याला उभंच रहावं लागतं.

-------------------------------------------------------------------------------------------------
ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरवू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते.

-------------------------------------------------------------------------------------------------
आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे? हे खरं त्यांना हवं असतं. त्याऎवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते आपल्याला ओळखतात.

-------------------------------------------------------------------------------------------------
तत्वाला चिकटुन कसं राहायचं हे पालीकडुन शिकावं. मुंगळा तसाच मान तुटली तरी गुळापासुन किंव्हा आपल्या पायाचा चावा घेतल्यशिवाय सोडत नाही. स्वत:च घर स्वत:च सांभाळायचं हे गोगल्गायीकडुन शिकवं. हाक मारताच क्षणीच तिथ क्षणात झेपावायचं आणि तोपर्यं बटणापाशीच थांबायचं हे इलेक्ट्रीसिटीकडुन शिकावं. सगळ्या पक्षांमध्ये घुबड हा एकमेव पक्षी कळप करुन रहत नाही, असं ऐकलय.एकटीने कसं जगाव. हे घुबडकडुन शिकव. समाज तप्त सूर्यासारखा असतोऽअगीचा कितीहि वर्षाव झाला तरीही सुर्यफुले सूर्याकडेच पाहत राह्तात.तोंड फिरवत नाईत.एखाद्या निरधार स्त्रीकडे समाज अशाच नजरेने पाहत असतोऽशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत कसं राहायचं ते सुर्यफुल शिकवतात. हे सर्व गुरु म्हणुन स्विकरले असेल तर जीवन जगणं सोप्प होईल.

-------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाण हाच नरक...................

-------------------------------------------------------------------------------------------------
आपण ईथून आता सात पवल चालू.आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावालागनिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मारताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध गेतलेला नाही.मी श्रधावन्त मात्र जरूर आहे.सौदर्य,संगीत,सुगंध,साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो.पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो.मला परमेश्वर व्हायच नाही.नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विच्रलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्ष्यम्य ठरतील. कुणाचही मन न दुखावण हिच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात,संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्त्नि हवीच होती,मात्र पत्त्नि झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.
मला सखी हवी आहे ..........होशील !!!..........

No comments: