Wednesday 9 April, 2008

" छँदाविषयी "- या पुस्तकाचे अवलोकन



छँदाविषयी - हे अनिल अवचट याच्या अनेक चाँगल्या पुस्तकाँपैकी एक पुस्तक.माणसाच्या आयुष्यात असलेले छँदाचे स्वरुप आणि त्याच्या स्वतः च्या जीवनातील विविध छँद वाढविण्यामागचे त्याँचे प्रयत्न याचे छान वर्णन या पुस्तकात आहे.


शिकणँ ही प्रक्रिया सतत चालूच असते. एखाद्या नव्या गोष्टी कडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो. हा शिकण्याचा काळच फार रम्य असतो.बोटे वळू लागतात. डोकँ त्या दिशेने चालून पकड घेउ लागतँ. आणि आपल्या हातुन एक नवीन गोष्ट उमटू लागते. ती एकच गोष्ट आपण अनेकदा करू लागतो.मग त्याचे वेड लागते.नन्तर आपण ती दुसर्याला करू देउ लागतो. प्रत्येक पायरीचा आनँद वेगवेगळा असतो.आनँद वाटल्या शिवाय त्या शिकण्याचे खरे सार्थक होत नाही.माझी अशी खात्री आहे की निसर्गाने प्रत्येकाला कलागुण दिलेलेच आहेत, त्याच्याकडे बघणे, ते वाढवणे, त्याला अग्रक्रम देणे आपल्या हातात आहे. त्याचा निर्भेळ आनँद लुटण्यासाठी त्याच्यातून पैसा मिळविण्यापासून किँवा किर्तीच्या विचारापासून दूर राहिलेलँ बरँच.
आपण या व्रत्तीने शिकत, प्रयत्न करत राहिलो तर कोण ना कोण गुरु भेटत राहतात.आणि कसली अपेक्षा न ठेवता महत्वाच असँ काही देउनही जातात. आपणही पुढच्याना याच भावनेनँ देत राहायचँ.अशा व्रत्तीतूनच कदाचित इथँ निकोप कला सन्स्क्रुती नाँदू लागेल हा भरवसा.

डोक्यात काही छँद असलेल्या माणसाँच मन काही वेगवेगळच असतँ.त्याला जे करावँ वाटतँ तेच तो करत असतो.ती कितीही क्षुल्लक गोष्ट असो.त्याचा अर्थिक फायदा असो वा नसो.त्यावेळी महत्वाची कामँ डोक्यावर बाँधलेली असोत तरी तो ती क्षुल्लक गोष्ट करीत बसणारच

Tuesday 8 April, 2008

? आपल्या काळात ?

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
................................................


शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी...
वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी...
कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून...
शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...
नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी...
पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी...
महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी...
आपण थांबून राहिलेले असतो .
एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल,
अशी आपणच आपली समजूत घातलेली असते .
पण, असं काही ठरवण्यापूर्वी
आनंदी होण्याचं ठरवा.

® http://www.orkut.com/Community.aspx?cmm=33294354

Saturday 5 April, 2008

माननीय, सन्माननीय, आदरणीय...

31 March च्या महाराष्ट्र टाइम्समधील सुरेख लेख - विजयराज बोधनकर

हल्ली या तिन्ही शब्दांची भलतीच चलती आहे. वाढदिवसांच्या निमित्ताने अनेक लोक माननीय होतात. माननीय व्हायला वयाची अट नसते. बड्यांचा मुलगा जसा आपोआपच माननीय म्हणून जन्माला येतो. त्याचे खूप वाढदिवस साजरे होतात आणि आपोआपच तो सन्माननीय होत जातो. नंतर खूप मोठमोठे वाढदिवस साजरे होतात आणि मग ते नकळत आदरणीय होत जातात.

अनेक वर्षांपासून ते कालपरवापर्यंत संकुचित वृत्ती होती ती, नावाच्या बाबतीत. अहो, आपल्या नावापुढे साधा 'श्री' लावायलाही लोक घाबरायचे, बाकीचं तर सोडाच! तेव्हा 'आदरणीय' हा मान कोणा पंडितजी, स्वामीजी किंवा बुद्धिमान उच्चविभूषितांनाच दिला जायचा. कारण स्वत:च्या कर्माने जो आदर निर्माण करायचा आणि मोठ्या विश्वासाने आदरणीय बनायचा, त्याला वास्तवतेचीच जोड असायची. चांगलं काम केल्यानंतर लोकांच्या मनात एक सन्मान निर्माण होतो. शिक्षक, कलाकार किंवा वक्ता यांनाच समाज 'सन्माननीय' संबोधायचा. जे देणग्या देतात, मोठ्या अंत:करणाने चांगल्या कामाला मदत करून आपला मान द्विगुणित करायचे अशांना समाज 'माननीय' म्हणायचा. म्हणजेच आदर, सन्मान आणि मान या तिन्ही शब्दांना योग्य तोच आणि तेवढाच न्याय मिळायचा आणि जे 'सो सो' जगायचे त्यांना 'श्री' किंवा जास्तीतजास्त 'श्रीमान' असे संबोधण्यात यायचं. म्हणजे सोन्याला सोनं, ताब्याला तांबे, पितळाला पितळ आणि लोखंडाला लोखंड म्हणण्याचाच तो काळ होता.

पण आता मात्र काळ बदलला. आता कोणीही केव्हाही कधीही सन्माननीय होऊ शकतो. ज्याला होडिर्ंगचं भाडं परवडतं, फ्लेक्सचा खर्च करणे शक्य आहे तो सन्माननीय होतो. इथे वयाची मर्यादा नसते. कर्तृत्वाची अपेक्षा नसते, अनुभवाचा तगादा नसतो. उत्तम फोटोग्राफर आणि सोबतीला कल्पक डिझाइनर हवा... काव्यात्मक लिहणारा कॉपी रायटर एवढी सामग्री तुमच्या हाताशी असली की तुम्ही ठरवा माननीय, सन्माननीय की आदरणीय बनायचं ते. कारण वाढदिवसावर (स्वत:च्या) प्रत्येकाचा हक्क असतो. वर्षातून एकदा तो साजरा करायचा असतो... मग लाजायचं तरी कशाला?

आपल्या शहरातील होडिर्ंग्ज हल्ली खूप कमवायला लागलेत. चांगला महसूल सरकारी तिजोरीत जातो. त्यातून बरीच विधायक कामं होऊ शकतात. किमान अशा समाज सेवेसाठी तरी आपण आपले वाढदिवस फ्लेक्सवर साजरे करायला हवेत. जेणे करून वाढदिवसाच्या पंधरा दिवस आधी तो फ्लेक्स लागला पाहिजे. यातून चाहता वर्ग तयार होतो आणि लगेचच पुढच्या वाढदिवसाला तुमच्या बॅनरवर (माफ करा, फ्लेक्सवर) तुमचे माननीय शुभेच्छुकसुद्धा येतात. तुमचं माकेर्टिंग फक्त तुम्हाला जमायला हवं.

आताचा काळ बराचसा निर्भय आणि न्यूनगंडमुक्त असा आहे. आपण कोण आहोत, आपलं कर्तृत्व काय, आपली बुद्धिमता किती, आपलं धडाडीचं कार्य, आपले विचार असा तुम्ही नीट विचार करत बसलात, तर आयुष्यात तुम्ही फ्लेक्सवर झळकणार नाही. त्यासाठी कठोर व्हा, निर्भय व्हा आणि स्वत:लाच प्रकाशात आणण्याचा विचार करा. मग, वाढदिवसानंतर सत्यानारायणच्या पूजेचा फ्लेक्स तयार करा. गणपती मंडळात निवड झाली तर त्याची प्रसिद्धी करा... साधं सहभागी प्रमाणपत्र मिळालं तरी संघ समजून त्याचा एक फ्लेक्स लावा.

दिवाळी, होळी, नवरात्र, आषाढी एकादशी, बुवाचं किर्तन, श्रींची पालखी, पास झालेले विद्याथीर् अशा हजारों कारणांसाठी तुम्ही फ्लेक्ससाठी तयार राहिलं पाहिजे. फक्त एकच काळजी घ्या... सारखेसारखे तुमचे फोटो बदलू नका... अहो, लोकं ओळखणार नाहीत. तुम्हाला त्याची सवय लागेल.

स्वत:च्या लग्नाचा फ्लेक्स, नातेवाईकांच्या बारशांचा, मित्राच्या लग्नाचा, ओटी भरण्याचा, जावळ काढण्याच्या कार्यक्रमातही फ्लेक्स करण्यासठी मागे-पुढे पाहू नका. यामुळे शहरातल्या नेहमीच्या चेहऱ्यांपेक्षा थोडे वेगळे चेहरे दिसतील आणि बघाणाऱ्या समाजाला थोडंसं वेगळं बघितल्याचं आत्मिक समाधान मिळेल. बकाल झालेलं शहरही अधिक वेगळं दिसायला लागेल.

पूवीर् बघा, स्वत:च राहतं घर, गाडी किंवा फोन घ्यायला अनेक वर्षं थांबावं लागायचं, पण आता सकाळी नावं नोंदवलं की ते सुख रात्रीपर्यंत दारात हजर. तसंच पूवीर् नावलौकिक मिळवायला प्रचंड मेहनत करावी लागायची. पण आता मात्र तसं नाही. एका रात्रीत किमान आठवड्यासाठी तरी तुम्ही हिरो बनू शकता. क्षुल्लक कारणासाठी भव्यदिव्य फ्लेक्स लावून आपल्याच प्रसिद्धीची तहान भागवू शकता. पण, एका गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या फ्लेक्सवर आदरणीय भितीयुक्त अशा तीन-चार सन्माननीयांचे फोटो टाकायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या नावापुढे किामन 'माननीय' हा शब्द तुम्हाला डकवता येईल. मग, तुम्हाला 'माननीय'ची सवय लागेल, ती वाढत जाईल आणि हा हा म्हणता त्या भागात आणि शहराच्या तुरळक भागात तुम्ही फेमस होतच जाणार. लोकांनी इतर मोठ्यांची केली, तशी तुमचीही टिंगल करतील. पण मनावर दगड ठेवा. लोकांच्या मनाचा,

शहराच्या बकालतेचा विचार करू नका. शहराची शोभा वाढवण्यासाठी कायम आपल्या चेहऱ्याची शोभायात्रा भरवत रहा म्हणजे शेवटी तुम्ही सन्माननीय आणि आदरणीय बनतच जाल. तेव्हा लगे रहो मुन्नाभाई... हरि ॐ हरी ॐ

Tuesday 1 April, 2008

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचे आहे
रोज सकाळी खड़या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे आहे
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचं आहे .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

मधली सुट्टी होताच वाटर बैग सोडून
नाळाखाली हात धरून पाणी प्यायचे आहे
कसा बसा डबा संपवत ....तिखट मीठ लावलेल्या
चिंच बोरं पेरू काकडी सगळँ खायचय
सायकलच्या चाकाला स्टंप धरून
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायाचय
उद्या पाउस पडून शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचे आहे
अनपेक्षित सुट्टीच्या अनंदासाठी.....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

घंटा व्हायची वात बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचे आहे
घंटा होताच मित्रांच कोदळँ करून
सायकलची रेस लावुनच घरी पोचयचं आहे
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपनातल्या
दोन तारेतुन निघून बाहेर पळायाच आहे
ती पळुन जायची मजा अनुभवायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचा आहे
दिवस भर किल्ला बाँधत मातीत लोळून पण
हात न धुता फरालाच्या ताटावर बसायचे आहे
आदल्या रात्री कितीही फटाके उड़वले तरी
त्यातले न उडालेले फटाके शोधत फिरायचे आहे
सुट्टी नंतर सगळी मजा मित्रांना सांगायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

कितीही ओझं पाठीवर असू दे ... जबाबदारीच्या ओझ्या पेक्षा
दप्ताराचं ओझं पाठीवर वागवायचं आहे
कितीही उकडत आसू दे .. वातानुकूलित ऑफिस पेक्षा
पंखा नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचे आहे
कितीही तुटका असू दे ओफिसच्या एकटया खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचे
" बालपण दे गा देवा " या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळाल्या सारखं वाटायला लागलय
ते बरोबर आहे का ते सरांना विचारायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

आपला बाप

हे लिखाण माझे नाही , कुठेतरी छानसे वाचलेले पण मनाला स्पर्श करून गेले म्हणुन डायरीत लिहून ठेवले होते तेच आता ब्लौग स्वरूपात आणले आहे.याचे लेखक कोण आहेत हे माझ्या स्मरनात नाही.


आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
आयुष्यातील श्रद्धास्थान .
आईवर खूप कविता आहेत.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.

बाप

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही




आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?
आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.
आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही.तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना?

कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?

वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं.त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते.