Tuesday 1 April, 2008

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे !

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचे आहे
रोज सकाळी खड़या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे आहे
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचं आहे .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

मधली सुट्टी होताच वाटर बैग सोडून
नाळाखाली हात धरून पाणी प्यायचे आहे
कसा बसा डबा संपवत ....तिखट मीठ लावलेल्या
चिंच बोरं पेरू काकडी सगळँ खायचय
सायकलच्या चाकाला स्टंप धरून
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायाचय
उद्या पाउस पडून शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचे आहे
अनपेक्षित सुट्टीच्या अनंदासाठी.....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

घंटा व्हायची वात बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचे आहे
घंटा होताच मित्रांच कोदळँ करून
सायकलची रेस लावुनच घरी पोचयचं आहे
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपनातल्या
दोन तारेतुन निघून बाहेर पळायाच आहे
ती पळुन जायची मजा अनुभवायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचा आहे
दिवस भर किल्ला बाँधत मातीत लोळून पण
हात न धुता फरालाच्या ताटावर बसायचे आहे
आदल्या रात्री कितीही फटाके उड़वले तरी
त्यातले न उडालेले फटाके शोधत फिरायचे आहे
सुट्टी नंतर सगळी मजा मित्रांना सांगायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

कितीही ओझं पाठीवर असू दे ... जबाबदारीच्या ओझ्या पेक्षा
दप्ताराचं ओझं पाठीवर वागवायचं आहे
कितीही उकडत आसू दे .. वातानुकूलित ऑफिस पेक्षा
पंखा नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचे आहे
कितीही तुटका असू दे ओफिसच्या एकटया खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचे
" बालपण दे गा देवा " या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळाल्या सारखं वाटायला लागलय
ते बरोबर आहे का ते सरांना विचारायला .....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचे आहे

2 comments:

Anonymous said...

are kiti chan mandalyat balpanichya bhavna!!!atachi ghusmat ajun chan vyaktach karta yet nahi re!!!!he vachun kharach sagla sodun parat javese vatata.nice yaar!!!!

uglyduckling said...

kiti chaan vatle ha lekh vachun.....kharach...parat jaun ekhadya khedyatlya shalet jaun admission gheu vattey....Thnks:-)